मुदखेड(ता. प्र.) तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चिकाळा तांडा लहान व चिकाळा तांडा मोठा या बिनविरोध झाल्या असून तिसरी ग्रामपं...
मुदखेड(ता. प्र.)
तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चिकाळा तांडा लहान व चिकाळा तांडा मोठा या बिनविरोध झाल्या असून तिसरी ग्रामपंचायत नागेली ही सुध्दा आजपर्यंत बिनविरोध झालेली असतानाच विरोधात पॅनल उभे केल्याने निवडणूक घेण्यात आले.
यात ७ पैकी २ जागा यापूर्वीच बिनविरोध झालेल्या असून ५ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. आज मतमोजणी तहसील कार्यालयात करण्यात आली यावेळी ४ जागा काँग्रेसप्रणीत महारुद्र ग्राम विकास पॅनलच्या ताब्यात गेल्या सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक झाली यात गोदावरीबाई विलासराव गव्हाणे यांनी भाजपचे सन्मित्राबाई भोजू पुयड यांना हरवून नागेली ग्रामपंचायत सलग ८ व्यांदा काँग्रेसप्रणीत ग्राम विकास पॅनलच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. १९८४ सालापासून आजपर्यंत नागेली ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात असणारी एकमेव ग्रामपंचायत आहे. कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा. शिंदे नागेलीकर यांच्या गावातीलच निवडणूक असल्याने ताब्यात ठेवणे महत्त्वाचे होते .

COMMENTS