नांदेड, ता.२८ (प्रतिनिधी)- येथील शिवधारा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी शिवधाराच्या ग्राहकांना संस्थेने आकर्षक असा सात टक्के लाभांश देण्याचा सर्वानुमते ठराव सभेत मंजूर करण्यात आला . शिवधाराच्या ग्राहकांना मोठी खुश खबर मिळाली आहे. असे वक्तव्य शिवधारा पतसंस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी येथे केले. ब्लेसिंग सभागृह ,
भारत इस्क्वेअर येथे शिवधारा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नांदेड रविवारी (ता.२५) ११ वी वार्षीक सर्वसाधारण सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी तज्ञ संचालक धनंजय तांबेकर, तसेच शिवधाराच्या उपाध्यक्ष किर्ती तगडपल्लेवार,सचिव निता कटकमवार,संचालक अनुराधा बोरगेमवार,मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे-सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील म्हणाल्या की, दरवर्षी सर्वसाधारण सभा होते. परंतु त्यातून ग्राहकांना वर्षभरात काय सुविधा मिळाल्या, हे अधिक महत्वाचे असते.शिवधारा नेहमीच ग्राहकांच्या हिताचा विचार करत आली आहे. या वर्षी देखील शिवधाराने ग्राहकांना सात टक्के इतक्या भरघोस लाभांची घोषणा केली आहे. मागील ११ वर्षाच्या कार्यकाळात शिवधाराने अतिशय उत्कृष्ट कार्य केले आहे.यापुढेही करीत राहील असा विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी संस्थेचे तज्ञ संचालक धनंजय तांबेकर यांनी संस्थेच्या वार्षिक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षांच्या परवानगीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालाचे वाचन केले. त्यानंतर प्रभारी शाखा अधिकारी गणेश येरकले यांना सर्वोत्कृष्ट अधिकारी तर जलील अहेमद मोहम्मद नूर यांना सर्वोत्कृष्ट दैनिक ठेव प्रतिनिधी पुरस्कार देऊन मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्या सोबतच उत्कृष्ट ठेवीदार, कर्जदार, गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थेचे सभासद,ठेवीदार , दैनिक आवर्त ठेव प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS