नायगाव प्रतिनिधी : काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या कृषीच्या गोदामातील निविष्ठा व साहित्याच्या चौकशी करा अन्यथा लोकशा...
नायगाव प्रतिनिधी :
काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या कृषीच्या गोदामातील निविष्ठा व साहित्याच्या चौकशी करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोत्तेवार होटाळकर व माधव बैलकवाड यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी कार्यालय नांदेड यांच्या कडे केली आहे
मागील आठवड्यात नायगाव येथील कृषी कार्यालयातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या उपलब्ध निविष्ठा,औषधे,फवारणी किट,शेती औजारे,हरभरा बॅग यासह विविध साहित्य शेतकऱ्यांना वाटप न करता काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने गोडाऊन मध्ये दडवून ठेवल्याचा पर्दाफाश करत दैनिक भास्कर ने नायगाव च्या कृषी विभागाची पोलखोल केली होती विशेष म्हणजे अधिकारी व कर्मचारी कृषी कार्यालयात सतत दांडी मारत असल्याने तक्रारीवरून नायगावच्या तहसीलदारांनी तलाठी राठोड यांच्या मार्फत १४ सप्टेंबर २०२२ रोजी पंचनामा केला होता यावरही वरिष्ठांनी अजून कोणताच निर्णय घेतला नाही यावेळी शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून उपलब्ध निविष्ठा वाटप न केल्याच्या तक्रारी वरून तलाठी यांच्या समक्ष गोदामाची चौकशी केली असता अनेक प्रकारचे औषधे, बियाणे, औजारे धुळखात असल्याचे आढळून आले यामुळे सदर साहित्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवले असल्याचे संशय व्यक्त करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे सदर प्रकरण तालुका कृषी अधिकारी दाबण्याचा प्रयत्न करत असून उपलब्ध निविष्ठा व साहित्याची चौकशी करून तालुका कृषी अधिकारी वरपडे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोत्तेवार होटाळकर व माधव बैलकवाड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांच्याकडे केली आहे सदर निवेदनासोबत गोदामात आढळून आलेल्या साहित्यांची तलाठी राठोड यांच्या समक्ष असलेल्या छायाचित्रे दिनांकसहित जोडली असल्याचेही नमूद केले आहे

COMMENTS