उमरा ग्राम पंचायतीवर माजी पंचायत समिती सभापती सतीश पाटील उमरेकर व बंधूचे वर्चस्व ; सरपंच पदासहित १३ पैकी १३ उमेदवार विजयी

लोहा,(प्रतिनिधी)      लोहा तालुक्यातील सर्कलचे मोठे गाव असलेले,अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या उमरा ग्राम पंचायतीवर लोह...
लोहा,(प्रतिनिधी)
     लोहा तालुक्यातील सर्कलचे मोठे गाव असलेले,अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या उमरा ग्राम पंचायतीवर लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर व उमरेकर बंधूचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून सरपंच पदासहित १३  पैकी १३ उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
   बॅरिस्टर शहाजी पाटील उमरेकर,डॉ. सचिन पाटील उमरेकर,माजी पं. स. सभापती सतीश पाटील उमरेकर, लोहा तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती स्वप्नील पाटील उमरेकर,संदीप पाटील उमरेकर, या ५ उमरेकर बंधूंच्या नेतृत्वाखाली लोहा तालुक्यातील उमरा ग्राम पंचायतीच्या  सार्वत्रिक निवडणूकीसाठी थेट जनतेतून सरपंच पदासह १३ ग्रा.पं.  सदस्याच्या जागेसाठी काल दि. १८ सप्टेंबर रोजी मतदान झाले व  आज दि. १९ सप्टेंबर रोजी लोहा तहसील कार्यालयात मतमोजणी झाली असून यात उमरेकर बंधूंच्या नेतृत्वाखाली  परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदासहित १३ ग्रा.पं. सदस्य पदाचे उमेदवारांचा दणदणीत विजय झाला असुन उमरेकर बंधूंच्या पॅनलनी विरोधकांचा धुव्वा उडविला असून विरोधकांना भोपळाही फोडता आला नाही.
 नवीन सरकारच्या नवीन नियमानुसार थेट जनतेतून जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाली आहे. उमरा हे गाव व ग्राम पंचायत ही लोहा तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे.
कलंबर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन कै. सभाजी पाटील उमरेकर व लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कै. मनोहर पाटील उमरेकर या बंधूचे गाव असून या भागात गेली अनेक वर्षांपासून उमरेकर घराण्याचे वर्चस्व असुन  उमरेकर बंधूंच्या नेतृत्वाखाली उमरा ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत  परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार पवार साईनाथ बालाजी यांचा दणदणीत विजय झाला तर ग्राम पंचायत सदस्य पदाचे सर्व विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सिरसाट सचिन मारोतराव, उमरेकर सचिन मनोहरराव, सोनटक्के सुनील व्यंकटराव, राठोड सतीश मारोती,जाधव रुक्मिणीबाई मोतीराम,सिरसाट आशा राजेश,चव्हाण प्रयागबाई व्यंकटी,पवार शेषाबाई दादाराव, पवार सारजाबाई सिताराम, शेख फैजमा मुजिम,राठोड सविताबाई शामराव,पवार संतोष तातेराव  हे उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
       या सर्व विजयी उमेदवारांचा  सत्कार लोहयात माजी पं.स. सभापती सतीश पाटील उमरेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात सतीश पाटील उमरेकर,संदीप पाटील उमरेकर,युवा सेनेचे लोहा -कंधार विधानसभा अध्यक्ष बालाजी गाडेकर, माजी ग्राम विकास अधिकारी जी.डी. सिरसाट,प्रशांत सिरसाट,अशोक पाटील उमरेकर,श्रीकांत पाटील उमरेकर,विठ्ठलराव पाटील उमरेकर,जना पवार,ओमसिंग राठोड,नागोराव पाटील उमरेकर,गोविंद सिरसाट,मकरंद पाटील आदीने केले.
Attachments area

 

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel