जांब बु.मतदारांनी घडविला ईतिहास; सेवानिवृत्त अधिकारी वसंत गायकवाड थेट सरपंचपदी विजयी जुन्ना-शिलाबाई वडेर, फुटकळवाडी-कमलबाई चव्हाण, पिंपळकुठा- रेखा गोपनर झाले जनतेतून थेट सरपंच

मुखेड / प्रतिनिधी        तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीची मतमोजणी आज तहसील कार्यालयात झाली. जांब बु. मतदारांनी ईतिहास घडवत सेवानिवृत्त अधिकारी व...

मुखेड / प्रतिनिधी

       तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीची मतमोजणी आज तहसील कार्यालयात झाली. जांब बु. मतदारांनी ईतिहास घडवत सेवानिवृत्त अधिकारी वसंत गायकवाड यांना थेट सरपंचपदी मताधिक्याने विजयी केले तर जुन्ना-शिलाबाई वडेर, फुटकळवाडी- कमलबाई चव्हाण, पिंपळकुठा- रेखा गोपनर ह्या थेट जनतेतून सरपंच पदी विजयी झालेत. विजयी उमेदवारांची फटाक्याच्या आतिषबाजीत गुलाल उधळत विजयी रैली काढण्यात आली. 
      तालुक्यातील जुन्ना, फुटकळवाडी, जांब बु., पाखंडेवाडी, पिंपळकुंठा या ५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपन्न झाल्या. थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक असल्यामुळे चुरशीची लढाई पहावयास मिळाली. यात पाखंडेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. सरपंच पदी योगेश सोनटक्के यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित ४ ग्रामपंचायतीचे मतदान रविवार १८ सप्टेंबर रोजी झाले. तर मतमोजणी सोमवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालयात सुरु झाली. तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असणाऱ्या जांब बु. ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी सेवानिवृत्त अधिकारी वसंत गायकवाड हे २०२० मताधिक्याने विजयी झालेत. प्रतिस्पर्धी भाजपा पुरस्कृत मनोज गोंड यांच्या पॅनलचे व माजी सरपंच प्र. बाळासाहेब पुंडे, अनिल कोल्हे यांच्या पॅनलच्या उमेदवारास मतदारांनी नाकारले. सरपंच पदाचे उमेदवार सचिन गायकवाड ७०, गोविंद शिकारे ७४, दशरथ शिकारे ७७२, पंकज शिकारे ६९२, विश्वनाथ सोनकांबळे २४ मतदान मिळाले. तर जुन्ना ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शिलाबाई मारोती वडेर ह्या ६६२ मते घेऊन विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी उमेदवार अहिल्या रमेश आमनर यांना ६३३, रुक्मिणबाई अभिमन्यू वडेर यांना २६ मते मिळाली. फुटकळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी कमलबाई देविदास चव्हाण ११४६ मते घेऊन विजयी झाल्या तर प्रतिस्पर्धी शोभाबाई बालाजी राठोड यांना ३६६ मते मिळाली. पिंपळकुंठा ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून सरपंच पदी रेखा पांडुरंग गोपनर ५८३ मते घेऊन विजयी झाल्या प्रतिस्पर्धी अहिल्या पाटील यांना ४६५ मते मिळाली. 
     मतमोजणी दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस प्रशासनाने चौख पोलिस बंदोबस्त ठेवला होते. विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. 

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel