शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांची मागणी
नांदेड विभागात दीडशे कोटी बाकी
नांदेड : भाऊराव ,पूर्णा, टोकाई, कुंटूरकर शुगर यासह नांदेड विभागातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम दिली नाही . आजघडीला नांदेड विभागातील साखर कारखानदारांकडे दीडशे कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. त्यामुळे या सर्व कारखान्याची विलंब व्याज आकारणी सुरू करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी साखर सहसंचालक यांच्याकडे केली आहे .
गतवर्षी पासुन राज्य सरकारने केंद्राच्या एकरकमी एफआरपी कायद्याविरोधात जावुन दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचे धोरण स्वीकारले. ऊस गाळपाला गेल्याच्या नंतर पंधरा दिवसांत एफआरपी रक्कम शेतकर्यांना मिळणे अपेक्षित होते परंतु राज्य सरकारने बेकायदेशीररीत्या केंद्राच्या कायद्याची मोडतोड करून दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचे धोरण स्वीकारले हंगाम बंद झाल्या झाल्या पूर्ण रक्कम शेतकर्यांना मिळणे अपेक्षित होते परंतु गाळप हंगाम बंद होऊन चार महिने उलटून गेले तरीही नांदेड विभागातील भाऊराव, पूर्णा ,टोकाई, बळीराजा , कुंटूरकर शुगर, एम व्ही के शुगर , देशमुख ग्रुप , सिद्धी शुगर यासह बहुतांश साखर कारखानदारांनी एफआरपी रक्कम अद्याप शेतकर्यांना दिली नाही आजघडीला नांदेड विभागातील साखर कारखानदारांकडे दीडशे कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहेत . त्यामुळे या सर्व कारखानदारांची विलंब व्याज आकारणी सुरू करावी व शेतकऱ्यांना व्याजासह एफआरपी रक्कम देण्यासाठी कारखानदारांना निर्देशित करावे अन्यथा शेतकऱ्यांच्यावतीने व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी निवेदनाद्वारे साखर सहसंचालक नांदेड यांना दिला आहे .

COMMENTS