नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड तालुक्यातील राहाटी बुद्रुक येथील पैलवान गोविंद शिवाजीराव बोकारे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरूवार दि.29 सप्टें...
नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड तालुक्यातील राहाटी बुद्रुक येथील पैलवान गोविंद शिवाजीराव बोकारे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरूवार दि.29 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 36 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने राहटी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या परिसरामध्ये ते पैलवान या नावाने परिचित होते. 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी गोदावरीकाठी राहटी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
COMMENTS