लातूर (प्रतिनिधी )
" अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन ही मोठी संधी असून विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन आपल्या साहित्यिक जाणिवा समृद्ध कराव्यात " असे आवाहन लातूरचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांनी केले. "साहित्यसंमेलन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत सोमवारी लातूर येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर होते. व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून शैलजा कारंडे, प्रा.नयन राजमाने, विनोद चव्हाण, जयश्री देशमुख उपस्थित होते. प्रारंभी विनोद चव्हाण यांनी प्रास्तविक केले. शैलजा कारंडे यांनी उदगीर येथे आयोजित साहित्यसंमेलनाविषयी माहिती दिली. अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनातून लेखक ,पुस्तके तर भेटतीलच पण आपल्या साहित्यविषयक संकल्पना स्पष्ट होतील असे गटशिक्षणाधिकारी पंचगल्ले पुढे बोलताना म्हणाले.
कथाकथनास प्रतिसाद.......
यावेळी धनंजय गुडसूरकर यांनी सादर केलेल्या कथेने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.कथाकथनाचा हा अनुभव घेऊन विद्यार्थ्यांनी संमेलन अनुभवण्याचा निश्चय केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद चव्हाण यांनी केले तर अमित होनमाळे यांनी आभार मानले.

COMMENTS