मुखेड (बालाजी पाटील)-
माकणी ता.मुखेड येथील पुरात वाहुन मृत्युमुखी झालेल्या गवलवाड कुंटूबियांना रोख रक्कम व जिवनावश्यक अन्नधान्याचे किटची मदत करुन सामजीक बांधीलकी जपली.बार्हाळी येथुन जवळ असलेल्या माकणी येथील अतिवृष्टीने पुरात वाहुन मृत्युमुखी झालेल्या स्व.गणपत गवलवाड यांच्या मृत्युने सर्व कुंटूब ऊघड्यावर आले होते.यामुळे मुक्रामाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्रामजी जाधव यांनी आपल्या खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले व गवलवाड कुंटुबियांना माकणी येथील त्यांच्या घरी जावुन रोख रक्कम व अन्नधान्य जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,बार्हाळी बिटचे जमादार पठाण साहेब,लुगांरे साहेब,पञकार नरसिंग अस्वले,गणेश जाधव,दत्ताञय तिपने,साईनाथ कोटगीरे,माकणीचे गव्हाणे गुरुजी,कबनुरचे सरपंच प्रतिनिधी पंढरी कांबळे,गोविंद कदम,राहुल देशमुख,गफारशेख,माधव गवलवाड,पिराजी गवलवाड,प्रकाश मोरे,शरद कदम,सुनील गव्हाणे आदी ऊपस्थितीत होते.
जाधव साहेबांच्या ऊपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.
COMMENTS