सोनपेठ/प्रतिनिधी
पुणे येथे कार्यरत असणारे ई-महाभूमीचे राज्य समनव्यक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे राज्याध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांच्याबद्दल असवैधानिकशब्दाचा वापर करुन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्यामुळे सोनपेठ तालुक्यात महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने सोनपेठ तहसील कार्यालयासमोर निदर्शने करुन उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचा निषेध करण्यात आला यावेळी आंदोलनाची दिशा वाढणार असल्याचे तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष रमेश लटपटे यांनी सांगितले.यावेळी त्यांनी सांगितले की,यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे चालू असताना त्याचे अहवाल व्हाट्सअप्पच्या अंतर्गत ग्रुपवर टाकले असता ज्ञानदेव डुबल यांच्याबद्दल ग्रुपवर अपशब्द वापरल्याने सदर आंदोलनाची व्याप्ती वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले यात ७ ते ८ ऑक्टोंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे,११ ऑक्टोंबर तहसील कार्यालयासमोर निदर्शने,१२ ऑक्टोंबर रोजी डी.एस.सी.परत करणे,१३ ऑक्टोंबर रोजी आपत्ती व निवडणूक विषयक कामे वगळता इतर कामावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू करणार असल्याचे सांगत १४ ऑक्टोंबर रोजी जगताप यांची बदली नाही झाल्यास आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे लटपटे यांनी सांगितले. सदरच्या आंदोलनात महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सचिव .आर.चिकटे,देवेंद्र चंदेल, सोमनाथ एकलिंगे,बी.व्ही.नागदे,एस.बी.मस्के,बी.डी.मुंडे,ए.डी.कदम,एस.आर.तांदळे,विलास वाणी,शाहूराव दीक्षित,ज्ञानेश्वर चारपीलवार,एस.बी.गोठे सह तलाठ्यांनी सहभाग नोंदवला होता.
COMMENTS