सोनपेठ/प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर ई.लक्ष्मीनगर लिंबा या साखर कारखान्याच्या २० गळीत हंगामाचे बॉयरल अग्निप्रदीपन नुकतेच पार पडले.यावेळी अग्निहोत्री यज्ञनेश्वर सेलूकर,अतुलगुरु खांडवीकर यांच्या पौरोहित्य लाभले यावेळी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.आर.टी.देशमुख,व त्यांच्या सुविद्य पत्नी कुंदाताई आर.देशमुख यांच्या हस्ते हा अग्निप्रदीपन कार्यक्रम पार पडला यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर अँड.रोहीत देशमुख,संचालक डॉ.अभिजित देशमुख,राहुल देशमुख,बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गोरखबापू धुमाळ,प्रमोटर इंदर कदम,गंगाधर गायकवाड,लक्ष्मीकांत घोडे,आश्रबा कडपे,प्रशासन अधिकारी राजकुमार तौर,चीफ अभियंता अनंत बावणे,मुख्य रसायनतज्ञ पी.ए.हेडे,शेतकी अधिकारी देविदास मोकाशे,मुख्य लेखापाल मुकेश रोडगे,भांडारपाल सोमनाथ सावंत,सुरक्षा अधिकारी नामदेव हारकळ,वसुली अधिकारी संजय महाजन,मोहन देशमुख,मुख्य वाणिज्य अधिकारी माणिक डोंबे,सोमेश्वर सिताफे यांच्यासह ऊस बागायतदार नारायण राठोड,पाराजी इदगे,संतोष रणेर,कर्मचारी,कामगार यांची उपस्थिती होती.यावेळी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावुन शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमाणे ऊस लागवडीसाठी योगदान द्यावे व आपले आर्थिक जीवन सफल करण्याचे आवाहन मा.आ. देशमुख यांनी केले.त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,साखर कारखान्याच्या रूपाने शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.या संधीचे सोने करणार असून कारखान्यावर आधारित उद्योग उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
COMMENTS