मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
केंद्र सरकरकडून शेतकरी, जनविरोधी धोरण राबवून तानाशाही, महागाई, बेरोजगारी आणि सामाजिक अन्यायात वाढ या विरोधात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन ' महाराष्ट्र बंद ' ची हाक दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी दिली आहे.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद बद्दल माहिती देताना डॉ. रॅपनवाड यांनी सांगितले की, लखीमपुर खीरी सह अनेक ठिकाणी हजारो शेतकरी वर्षभर उन पाऊस थंडीत आपल्या न्याय्य हक्कांसाठी संवैधानिक आंदोलने करीत असताना केंद्र सरकारने न्याय देण्याऐवजी तानाशाही करून आंदोलने चिरडण्याचे प्रयत्न केले. नुकतेच शेतकरी लढ्याबद्दल भडकावू भाषण करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालून अनेकजण ठार व जखमी केले. ही तानाशाही व जीवघेणी महागाई, वाढती बेरोजगारी आणि आरक्षण विरोधी धोरण, वाढता सामाजिक अन्याय याविरोधात जनतेचा आवाज म्हणून आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे.
आजच्या महाराष्ट्र बंद मध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी,शेकाप सह घटकपक्षच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आणि व्यापारी, नागरिकांनी सहकार्य करून बंद यशस्वी करावे असे आवाहन काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केले आहे.
COMMENTS