सोनपेठ/प्रतिनिधी
लखीमपुर येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या चिरंजीवाने गाडीखाली चिरडवून मारल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर सोनपेठमध्ये व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी या बंदला समिश्र पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर दुपारपासून प्रतिष्ठाने उघडण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दशरथ पाटील-सूर्यवंशी यांनी केल्यानंतर या बंदची सांगता झाली.दरम्यान या बंदमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश विटेकर,लक्ष्मीकांत देशमुख,मदनराव भोसले,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे,तालुका समनव्यक रंगनाथ रोडे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान पायघन,शहरप्रमुख कृष्णा पिंगळे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.मुंजा धोंडगे,शिवाजी कदम,रामेश्वर मोकाशे,शिवाजी भोसले,राजेभाऊ अंबुरे,राजू सौदागर,जगन्नाथ पाटील,अशोक यादव,नासीर पठाण,आंनद गुजराथी आदींसह कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला होता.या बंद दरम्यान सोनपेठ पोलीसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने,पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिरी,मंचक फड,दिलीप निलपत्रेवार यांच्यासह पोलिसांनी महत्वाची भूमिका घेतली होती.
COMMENTS