केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील आचार्य विनोबा भावे सार्वजनिक वाचनालयात शुक्रवारी सकाळी वाचन प्रेरणा दिन साजरा करून भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले.
याविषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील आचार्य विनोबा भावे सार्वजनिक वाचनालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन प्रेरणा दिन साजरा करून भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी सुरुवातीला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व "वाचाल तर वाचाल" या उक्तीप्रमाणे आजच्या युगातील तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल व पर्यायाने पुढील उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल म्हणून वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन ग्रंथालयाचे ग्रंथपाल अनिल गलांडे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धारूर येथील प्रसिद्ध व्यापारी गुन्नाल साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालयाचे सचिव दगडू दळवे होते, यावेळी ग्रंथालयाचे ग्रंथपाल अनिल गलांडे, लिपिक रवींद्र गलांडे,सेवक लक्ष्मण काळे, दत्तात्रय बोर्डे, प्रदिप गलांडे, गजानन कटके, शुभम राऊत यांच्यासह गावातील वाचक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS