केज प्रतिनिधी . :- केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील भिमनगरमध्ये आज दि.१५ आँक्टो रोजी ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोका विजयादशम...
केज प्रतिनिधी .
:- केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील भिमनगरमध्ये आज दि.१५ आँक्टो रोजी ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोका विजयादशमी उत्साहात साजरा करण्यात आली.
या निमित्ताने आज भिमनगर मधील बौद्ध विहाराच्या आवारात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्वप्रथम अगोदर पंचशील ध्वजाचे संजय लांडगे व राहुल उजगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रकाश सातपुते व आनिल उजगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदना घेऊन या महापुरूषांना वंदन करण्यात आले.यावेळी किरण सातपुते,अनंत सातपुते,विष्णु बचुटे,महादेव बचुटे,प्रदिप सातपुते,बालु सातपुते,सुमेध उजगरे,संकेत बचुटे,विजय गालफाडे व मोठ्यासंख्येने समाज बांधव व धम्म भगिनी उपस्थित होत्या.
COMMENTS