सेलू :
येथील नूतन विद्यालय क्रीडा विभागात दरवर्षी प्रमाणे दसरा विजया दशमी निमित्ताने शुक्रवार ( दि. १५ ) रोजी क्रीडा साहित्यचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक नारायण सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,' कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय क्रीडांगण ओस पडली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून क्रीडा स्पर्धा बंद आहेत. यानंतर कोरोनाचे संकट टळो , ईडा पिडा दूर होवून परत सर्व विद्यार्थी मैदानावर खेळोत आणि क्रीडा विभागाचे खेळाडू यशस्वी होण्यासाठी आपण प्रार्थना करु या. ' दसरा विजया दशमी निमित्त क्रीडा विभागातील विविध खेळांच्या साहित्यचे पुजन करण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक किरण देशपांडे, क्रीडा शिक्षक गणेश माळवे, सतिश नावाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख काशीनाथ पल्लेवाड, सहविभाग प्रमुख सुरेश हिवाळे, गोरखनाथ घायाळ, अरुण रामपूरकर हे उपस्थित होते.
COMMENTS