प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली शहरातील माऊली नगर परिसरातील रहिवासी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ऊत्तमराव काळे यांनी कर्जास कंटाळून गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की माऊली नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उत्तमराव काळे हे गुरूवारी सकाळी दररोज प्रमाणे फिरण्यासाठी गेले होते. मात्र घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता शुक्रवारी सकाळी त्यांचा म्रतदेह बळसोंड शिवारातील एका शेतात झाडाला दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्याची माहिती मयताच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे जमादार गजानन पोकळे यांनी घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी मयताचा मुलगा दुर्गेश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे की, मयत उत्तमराव काळे यांनी घरबांधणीसाठी वाशीम येथील एका व्यक्ती कडून 6 लाख 95 हजार रूपये कर्ज घेतले होते.व सेवानिवृत्तीची काही रक्कम मिळाली नव्हती म्हणून बँकेचे वेळेवर कर्ज फेडू शकत नव्हते ज्याचे टेन्शन घेऊन गळफास लाऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात म्रुत्यु ची नोंद करण्यात आली आहे. विजया दशमीच्या दिवशी दुर्दैवी घटना घडल्या ने काळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
COMMENTS