*एकविध क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षक वतीने सत्कार*
परभणी (क्रीडा प्रतिनिधी) क्रीडा,कला,सांस्कृतिक, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात काम केले.खेळाडूला वाव मिळावा आणि त्यातून चांगले खेळाडू पुढे यावे यासाठी नेहमी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले. खरी राष्ट्रीय एकात्मता कुठ जोपासली जात असेल तर ती क्रीडा क्षेत्रात. त्यामुळे शिवसैनिक ते खासदार संजय जाधव असा यशस्वी जीवनाचा उदय क्रीडा क्षेत्रातूनच झाला असल्याचे सत्काराला उत्तर देताना खा. संजय जाधव यांनी प्रतिपादन केले.
परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामूहिक यशस्वी लढ्याचे प्रभावी नेतृत्व खा. संजय जाधव यांचा क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक, खेळाडू यांच्या वतीने शहरातील बी.रघुनाथ सभागृहात शनिवार (दि. 9) ऑक्टोबर रोजी संयोजन समितीच्या वतीने मानपत्र, गौरवचिन्ह, शाल,श्रीफल आणि पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.सुरेश वरपुडकर तर सत्कारमूर्ति म्हणून खा. संजय जाधव उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.सुरेश देशमुख, उपमहापौर भगवानराव वाघमारे, स्थायी समिती सभापती गुलमीरखान, मनपा सदस्य सुनील देशमुख, बालासाहेब बुलबुले, अतुल सरवदे,विश्वजीत बुधवंत, सुहास डहाळे,क्रीडाधिकारी नरेंद्र पवार , प्रा.यु. डी. इंगळे , मंगल पांडे, प्रा. डॉ. माधव शेजुळआदिंची उपस्थिती
होती.टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन वतीने खा. संजय जाधव यांचा सत्कार करताना राज्य सचिव गणेश माळवे, जिल्हा सचिव सतिश नावाडे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर देशमुख, प्रा.नागेश कान्हेकर, टे.टे.प्रशिक्षक चेतन मुक्तावार, तुकाराम ठोंबरे.
पुढे बोलताना खा.संजय जाधव म्हणाले की पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे होतकरु,गरजू खेळाडूंना बळीराजा साखर कारखान्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्व क्षमता असतानाही मिळत नसल्याची खंत मनात होती त्यामुळे जनआंदोलन उभारले आणि सर्वांच्या सहकार्याने महाविद्यालय मिळाल्याने लढ्याला यश आले असल्याचे सांगितले.यानंतर माजी. आ.सुरेश देशमुख, डॉ. माधव शेजुळ,माधव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपातुन आ.सुरेश वरपुडकर म्हणाले की कबड्डी खेळाडूसह इतर खेळाडूनी परभणी जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात चमकवले. खेळातील पाच टक्के आरक्षणामुळे कबड्डीतून अनेक मुले-मुली नोकरीत आहेत. पाथरी तालुक्यासाठी सुसज्ज आणि भव्य असे क्रीडांगण मंजूर करुण घेतले असल्याचे सांगितले. प्रा. डाॕ. चंद्रकांत सातपुते यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रंजीत काकडे तर मानपत्राचे वाचन संभाजी शेवटे यांनी केले आणि आभार प्राचार्य प्रकाश हरगांवकर यांनी मानले.सत्कार सोहळा यशस्वीतेसाठि समन्वयक माणिक कदम, गोपाळ मोरे , पी.आर.जाधव , कैलास माने, माधव शिंदे , सुशिल देशमुख, प्रकाश हरगांकर, शिवाजी खूने, कैलास टेहरे, विजय गारकर,किशोर भोसले, राजेश शहाणे, धनंजय बनसोडे, सुदाम लाड जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक,क्रीडा संघटक , खेळाडू
, प्रक्षिशक , क्रीडाप्रेमी नागरिकक्रीडा संघटक कार्यक्रम समन्वय समितीच्या वतीने खा.संजय जाधव, आ.सुरेशराव वरपुडकर, माजी आ. सुरेशदादा देशमुख यांचा सत्कार करताना डॉ. माधव शेजुळ, उपप्राचार्य चंद्रकांत सातपुते, सुशीलकुमार देशमुख,पी.आर.जाधव, माधव शिंदे, माणिक कदम, कैलास माने, गोपाळ मोरे, किशोर देशमुख, प्रकाश हारगांवकर, रणजित काकडे, किशोर भोसले आदी उपस्थित होते.
आदिसह संयोजन समितीच्या वतीने परिश्रम घेतले.
COMMENTS