धर्माबाद (अहमद लड्डा) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवती येथील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक श्री शिवकुमार पाटील यांनी 01 ऑगस्ट 2021 रोजी थोरसमाज सुधारक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी घेतलेल्या गुगलमीट ऑनलाइन कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात ता. बिलोलीचे फौजदार अनिल सनगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले, "विपरीत परिस्थिती असूनही अण्णाभाऊंनी स्वतःला सिद्ध केले; त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी येणाऱ्या स्पर्धेच्या काळात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थिदशेपासूनच कठोर परिश्रम घ्यावे".
कोरोना विषाणू संक्रमण प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज श्री शिवकुमार पाटील यांनी गुगलमिट द्वारे हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शाळा पाटोदा चे मुख्याध्यापक अशोक कागेरू सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी भोसले, हिंदू युवावाहिनी धर्माबादचे अध्यक्ष सतीश मोटकुल, सहशिक्षक व्यंकटेश बतूलवार,सौ. पुष्पा नोरलावार उपस्थित होते .
हा कार्यक्रम श्री शिवकुमार पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन विद्यार्थी कु. संजीवनी कौडकर व कु. कल्याणी पडोळे यांनी केले. पल्लवी जायवाड ,वैष्णवी इरलोड,आरती कोंकुलवार,
प्रेमलता सूर्यवंशी, पूजा जाधव गायत्री इबितवार ,धनश्री भोसले शितल पांचाळ, रोशनी बोईनवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, युवक व शिक्षण प्रेमींनी सहभाग नोंदविला .राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS