प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी कृषीसभापती उध्दवराव कौडगावकर यांच्या आठवणींना उजाळा..

मारतळा (वार्ताहर):-  नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती उध्दवराव पाटील कौडगावकर यांच्या प्रथ...


मारतळा (वार्ताहर):- 

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती उध्दवराव पाटील कौडगावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कौडगाव ता.लोहा येथील कार्यक्रमासाठी अनेक सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरानी उपस्थिती लावुन समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करुन आभिवादन केले.

 या प्रसंगी माजी मंत्री डि.पी सांवत हे आठवणीना उजाळा देतांना म्हणाले की,उध्दवराव कौडगावकर हे अतिशय मनमिळाऊ स्वभाव असणार व्यक्तीमत्व होत.त्यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य फार मोलाचे होते त्यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले ते सामाजिक बांधिलकी जपणारे दृष्टे विचारवंत होते उमरा,मारतळा परीसराच्या विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. कौटुंबिक कलहापासुन ते मोठमोठी भांडण तंटे त्यांच्या एका शब्दावर मिटत असत विरोधी पक्षातील अनेक नेते सुध्दा त्याचे चांगले मित्र होते त्यांची साधी राहणी असुन देखील विचारश्रेणी उच्च दर्जाची होती त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटायचे त्यांना भेटणारा प्रत्येक माणुस त्यांचा चाहता होऊन गेला इतका मृदु त्यांचा स्वभाव होता त्यामुळे ते कायम स्मरणात राहतील असे ते म्हणाले यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त कराताना आठवणीना उजाळा दिला. 

कार्यक्रमासाठी आमदार मोहणअण्णा हंबर्डे,उद्योजक बालाजीरावजी जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,माजी आमदार रोहिदास चव्हाण,मुक्तेश्वर धोंडगे,कल्याण सावकार सुर्यवंशी,केरबा सावकार बिडवई,रंगनाथराव भुजबळ,हंसराज पाटील बोरगावकर,अविनाशजी जाधव,माधवराव पांडागळे,डाॅ श्याम तेलंग,बालाजीराव पांडागळे,शिवाजीराव कपाळे,डॉ सचिन उमरेकर, संदीप उमरेकर,प्रशांत तिडके,निळकंठराव केशवे,शहाजी नळगे,रामराव वाघमारे,दत्ता पाटील हाळदेकर, निरंजन पाटील कौडगावकर,साईबाबा कौडगावकर आदीची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी यावेळी मोहनराव सिरसाट,गोविंदराव जहागिरदार,भास्करराव जोमेगावकर, नागोराव पाटील आलेगावकर, उत्तमराव वडवळे कापसीकर किशनराव लोंढे राम सोनसळे श्रावण राठोडआदीसह मारतळा परिसरातील अनेक गावातील नागरिकांची अपस्थिती होती यावेळी पुण्यस्मरण दिनानिमीत्त अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group