नायगांव / प्रतिनीधी
(रामप्रसाद चन्नावार)
तालुक्यात विविध ठिकाणी साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती सामाजिक उपक्रमाणे साजरी करण्यात आली आहे .
बहुजन नायक साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या 101 वी जयंती निमित्य नायगांव तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबुण साजरी करण्यात आली आहे . मौजे होटाळा येथे जयंती निमित्य शिवराज पाटिल होटाळाकर मित्रमंडळाच्या वतीने विध्यार्थाना शैक्षणीक साहित्य वाटप करून अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी शिवराज पाटिल होटाळकर , सरपंच गणेश पवार , शिवाजी पवार , चंद्रकांत पवार , माधव कल्याण , महेश पवार ,भगवाण भद्रे , खंडु कोतेवार , दिपक कोतेवार ,इंद्रजीत कोतेवार ,आशोक कोतेवार,मुख्यादयापक पंढरीनाथ कोतेवार आदीची उपस्थीती.
त्याचबरोबर इंदिरा सार्वजनिक वाचनालय नायगांव येथे,लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती वाचकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली याप्रसंगी बापुराव गायकवाड सर,नागनाथ चोंडे सर,रामचंद्र सालेगाये,गायकवाड बेलदारकर साहेब,ग्रंथालयाचे अध्यक्ष रा.ना. मेटकर,जवळे सर,डॉ.प्रभाकर गायकवाड,लिंगुराम पाटील,विठ्ठल भेंडेकर,संजय भद्रे,मारोती वाघमारे,नेहरू सर,दिगंबर झुंजारे,रणजित गोरे,सचिन वाघमारे,नितीन गायकवाड,भूषण काळेवार,आकाश मेटकर , माणिक चव्हाण ,हिम्मतसिंग टाक आदी उपस्थित होते.
तसेच नायगांव नगर पंचायत कार्यालयात अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले या वेळी , उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण , गटनेते सुधाकर पाटील शिंदे ,तलाठी विजय जाधव , लिपिक रामेश्वर बापुले ,श्रीधर कोलमवार , संभाजी भालेराव ,बसवंत कल्याण , श्रीराम बेळगे ,जीवण चव्हाण. शेख माजिद.बालाजी बोईनवाङ. आदि उपस्थित होते .

COMMENTS