प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
नांदेड परिक्षत्राचे डिआयजी निसार तांबोळी यांनी परिक्षत्रात अवैध धंद्यावर कारवाई ची धडक मोहिम सुरू केली असुन हट्टा ठाण्याचे दबंग ठाणेदार गजानन मोरे यांनी दोन ठिकाणी तिरट जुगारावर कारवाई करून 3 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई ने हट्टा ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. हट्टा पोलिस ठाण्याला लाभलेले कर्तबगार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी ठाण्यात रूजु झाल्यापासूनच कारवाई चा बडगा उगारला आहे. सोशल पोलिसिंग बरोबरच ठाणेदार गजानन मोरे हे एक कर्तव्य कठोर अधिकारी म्हणुन जिल्ह्यात ओळखले जाताता. गजानन मोरे यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून शनिवारी सायंकाळी वडद शिवारातील उसाच्या शेतात तिरट नावाच्या जुगार अड्यावर हट्टा पोलिसांच्या पथकाने कारवाई केली यावेळी सात जुगारींवर कारवाई करून त्यांच्या कडून जुगाराचे साहित्य, नगदी रक्कम मोटारसायकल असा एकुण 1 लाख 80 हजारांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. तर दुसरी कारवाई रविवारी सायंकाळी धानोरा शिवारात कँनाँल च्या काठावर सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करून सात जुगारी ताब्यात घेतले त्यांच्या कडून नगदी, जुगाराचे साहीत्य, मोटारसायकल, मोबाईल असा एकुण 1 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाई मध्ये एकुण 14.जुगारी यांच्या वर कारवाई करून एकूण 3 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टयाचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या पथकाने केली आहे.

COMMENTS