भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील कर्ज वसुलीसाठी न्यायालयात दाखल करण्...
भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील कर्ज वसुलीसाठी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांना पैकी १०८५ प्रकरणात काल राष्ट्रीय लोक आदलतीत तडजोड करण्यात आली. या तडजोडीतून बँकेची १० कोटी ४४ लाख रुपये वसुली झाली असल्याची माहिती भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय मुख्य व्यवस्थापक श्री शंकर येरावार यांनी दिली. राष्ट्रीय लोक आदालतीच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्या बदल बँकेचे उपमहाप्रबंधक श्री अकुला श्रीनिवास यांनी समाधान व्यक्त केलं आहे. - आनंद कल्याणकर नांदेड

COMMENTS