आयोजित
सैनिक सन्मान सोहळा दिनांक २६ जुलै रोजी आँनलाईन गुगलमीटवर संपन्न झाला
२६ जुलै हा दिवस भारतीय सेनेच्या वीरतेचा विजय सोहळा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताने कारगिल युद्धामध्ये आपला विजय तिरंगा झेंडा फडकविला होता. भारताच्या इतिहासात हा दिवस खूप मोलाचा असल्याने त्या दिवसापासून हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
कारगिल युद्धामध्ये आपल्या शहीदांची आठवण जनतेच्या स्मरणात कायम राहणयासाठी आमचा प्रयास आहे. त्यांच्या शौर्याला सलाम करून आजच्या तरुण पिढीला प्रोत्साहित करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर संमेलनाध्यक्षा सैनिक भारती ह्युमँनिटी फाउंडेशन आणि सैनिक भारती सखी मंचच्या *संस्थापिका प्रेसिडेंट मा. श्रीमती प्रतिमा राव यांनी* सर्वांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणांत त्यांनी संस्थचे उद्दिष्ट आणि आजवरचे कार्य याची थोडक्यात माहिती दिली आणि *शहीद वीरपुत्र मेजर कौस्तुभ राणे* यांच्या पूज्य मातोश्री मा. सौ.ज्योती राणे आणि पिताश्री मा. श्री प्रकाश राणे यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सम्मानित केले.
त्यानंतर सैनिक भारती व सखी मंच सदस्य, कौन्सिलिंग सायकोलॉजीस्ट, समाजसेविका, कवयित्री डॉ.अलका नाईक मँडम यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन भारतीय सेनेच्या शहीदांसाठी एक भावपूर्ण हिन्दी कविता सादर केली.
v तद्नंतर पुरस्कारप्राप्त वीरमाता *मा. सौ. ज्योती राणेजी* यांनी अतिशय हळव्या शब्दांतून मेजर कौस्तुभच्या पराक्रमाची गाथा सांगितली, तसेच आजच्या तरूणांना आत्मविश्वासाचा संदेश दिला.
v *सन्माननीय आमंत्रित मान्यवर*
v : कमांडर अशोक श्रीवास्तव सर
v : विंग कमांडर शिंदे साहेब
v : माजी सैनिक बेंद्रे साहेब
v : स्वगीय कॅप्टन शर्मा मॅडम
v : डॉ रविन्द्र मरदाणे
v : कर्नल गुलेरीया, मॅडम गुलेरिया
v : गुप्ता सर माजी सैनिक
v : अरूण वालवे सर
v : मिसेस मीना प्रभाकर बेंद्रे:
v : माजी सैनिक मोहन जोशी
v : माजी सैनिक जोशी सर नौपाड़ा
v : शहीद पत्नी सुनीता राजगुरु
v : कमांडो राजू पाटील
v : माजी सैनिक पत्नी, समाज सेविका
v : दीप्ति महाडिक मॅडम
v : रेखा संगम मॅडम
v : कमांडर श्रीवास्तव सर
v : माजी अफसर पत्नी जॉर्ज मॅडम
v : माजी सैनिक विक्रम पालवे साहेब
v : माजी सैनिक गणेश कोते साहेब
v : माजी सैनिक प्रकाश सावंत
v : माजी सैनिक निलांबर ठाकूर
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर योध्यांनी आपापल्या युद्धाच्या आठवणी मनोगताच्या
माध्यमातून व्यक्त केल्या. प्रामुख्याने- *कमांडर अशोक श्रीवास्तवसर, विंग कमांडर शिंदे साहेब, डॉ. रविन्द्र मरदाणेसर, मिसेस मीना प्रभाकर बेंद्रेजी, माजी सैनिक विक्रम पालवे साहेब, माजी सैनिक प्रकाश सावंत* यांनी आपल्या आठवणी सांगताना श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन श्रीमती नम्रता शिंदे, प्रशासकीय अधिकारी-NAB, सदस्य सैनिक सखी मंच यांनी केले. तसेच सैनिक भारती सदस्य,TV कलाकार, मानवाधिकार राष्ट्रीय सल्लागार, कवी श्री. दिपक खांडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
पुन्हा एकदा या शोर्यदिनाच्या शुभेच्छा देऊन राष्ट्रवन्दनाने सांगता करण्यात आली.
डॉ. अलका नाईक, श्रीमती नम्रता शिंदे, श्री. दिपक खांडेकर आणि सैनिक भारती सदस्य सौ. सविता जुमळे या आयोजन समिती सदस्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बहुमोल कामगिरी बजावली.
जय हिंद !!

COMMENTS