धर्माबाद (अहमद लड्डा) कारगिल विजयी दिवसाचे औचित्य साधून धर्माबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी सैनिक विनोबा पा उमरे सालेगावकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
डिसेंबर 2020 मध्ये सेवा निवृत्त झालेले उमरे हे मुळचे सालेगांव येथील रहिवासी. एकूण 19 वर्षे देशाच्या सीमेवर देश रक्षणाची जबाबदारी पार पाडली. सेवा काळात ते जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश ,उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय अदि सीमेवर खडा पहारा दिला. अखंड देश हित ध्यानी मनी ठेवून कारगिल युध्दात प्राणाची बाजी लावली आणि शत्रू सैनिकाशी दोन हात केले व युध्दात विजयाची पताका अटकेपार नेली.आजच्या पिढीला देश रक्षणाचा आदर्श दिला. कारगिल युध्दातील प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून या विजयी दिवसाचे औचित्य साधून येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात विनोबा उमरे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पंडित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष हनमंत पा किरोळे,युवक शहराध्यक्ष मोहसिन खान,नगरसेवक प्रतिनिधी सुधाकर जाधव,जावेद सर,राष्ट्रवादी ता. उपाध्यक्ष दिलीप कदम,वाजिदसाब, शुभम सिंगनवाड,रेहान कुरेशी यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


COMMENTS