राम दातीर
श्रीक्षेत्र माहूर(प्रतिनिधी )राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुखी,समाधानी व दीर्घायुष्य लाभू दे,त्यांच्या हातून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळू दे अशी शिवसैनिकांनी श्री रेणुकामातेला प्रार्थना केली.
उद्धव ठाकरे यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून मंगळवार दि.27 जुलै रोजी स.10 वा. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे,तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,शहर प्रमुख निरधारी जाधव व युवासेनेचे तालुका प्रमुख विकास कपाटे यांनी प्रवेश द्वारावर मातेच्या प्रतिमेला अभिषेक घालून महाआरती केली.यावेळी माजी तालुका प्रमुख दिपककाका कन्नलवार,न.प.गटनेते दीपक कांबळे, प.स.चे उपसभापती उमेश जाधव,बालाजी वाघमारे, अभिषेक जयस्वाल,राजाराम गंदेवाड,रुपेश कोवे,जितू चोले,संदीप गोरडे,सुरेश आराध्ये,विक्की तामखाने,पवन गवळी,पत्रकार कार्तिक बेहेरे यांचेसह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.या विधीचे पौरोहीत्य वेशासं चंद्रकांत रिठे व मंगेश काण्णव यांनी केले.


COMMENTS