आपण पद-प्रतिष्ठेने कितीही मोठे असलो तरीही जनता आणि कार्यकर्ते यांनाच केंद्रबिंदू मानून अविरतपणे कार्य करणारा जिल्ह्यातील प्रमुख नेता म्हणून ज्यांचे नाव तुमच्या आमच्या ओठावर नेहमीच येत असते, असे जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचा २ ऑगस्ट वाढदिवस...
आदरणीय खासदार साहेबांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा नेता म्हणून खासदार साहेबांची एक वेगळी ओळख नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. साहेबांची राजकीय प्रवासाची संघर्षमय कारकीर्द आपल्यासमोर आहे ती साहेबांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर.. आणि म्हणूनच साहेबांनी हे त्यांना जीवापाड जपले आहे. यापुढेही आदरणीय साहेबांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आणि कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देणारे ठरणार आहे. अशा या आदरणीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांची उत्तरोत्तर भरभराट व्हावी, त्यांची राजकीय कारकीर्द संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवावी, हीच मनोभावे प्रार्थना !
होय आपण अशा विभूती बद्दल बोलत आहोत की ज्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला जमिनी पासून सुरुवात केली आहे.
ज्यांनी विद्यार्थीदशेपासूनच आपल्या संघटन कार्याला एक मोठी दिशा दिली आणि ज्या वयात मुलं खेळण्यांमध्ये रमतात त्या वयात म्हणजे वयाच्या अगदी एकविसाव्या वर्षात ग्रामविकास शिक्षण संस्था चिखली या संस्थेची स्थापना करून गोरगरीबांना वंचितांना शिक्षणाची दारे उघडून दिली ते आहेत नांदेड जिल्ह्याचे खासदार लोकनेते जन नायक लोक नायक प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर.
- साहेबांचा राजकीय प्रवास हा त्यांच्या गावापासून सुरू होतो.
- 1989 साली चिखली गावचे सरपंच
- 1992 कृषि पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती जिल्हा परिषद नांदेड सभापती
- 1993 कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना लिमिटेड गांधीनगर चे संचालक
- 1994 मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कार्यकारिणी सदस्य
- 1997 शिक्षण व आरोग्य समिती जिल्हा परिषद नांदेड सभापती
- 2001 अर्थ व बांधकाम समिती जिल्हा परिषद नांदेड सभापती
- 2001 लोहा तालुका समन्वय समिती अध्यक्ष
- 2002 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड उपाध्यक्ष
- 2002 जिल्हा परिषद सदस्य
- 2004 कंधार लोहा विधानसभा मतदार संघातून आमदार या काळात विविध विकास कामांवर साधारण साडे पाचशे कोटींचा निधी खर्च
- 2005 कंधार नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर कार्यकर्त्यांची वर्णी
- 2007 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून आणून सत्तास्थापनेचे शिल्पकार
- 2008 लोहा नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या विजयाचे शिल्पकार
- 2009 कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा निवडणुकीत 18 पैकी 15 संचालकांना निवडून आणण्याचे कार्य
- 2014 कंधार लोहा विधानसभेवर पुन्हा आमदार
- 2019 नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार
- 2019 आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे नांदेड शहरात आयोजन करून नांदेड शहराला आंतरराष्ट्रीय पटलावर रेखांकित करताना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद.
असा वादळी राजकीय प्रवास साहेबांनी केला आहे. साहेबांचा झंझावात, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, जनतेचे आशीर्वाद आणि पाठबळ यामुळे आज नांदेड जिल्ह्यातील अनेक विकास कामांना गती आली आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना भेटता यावे, बोलता यावे, त्यांच्या प्रश्नांची त्वरित दखल घेता यावी यासाठी साहेबांनी भव्य संपर्क कार्यालय उभे केले आहे. साहेबांच्या भेटिला जो कोणी येतो, प्रश्न मांडतो, साहेब त्वरित संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना प्रत्यक्ष संवाद साधून तो प्रश्न निकाली काढतात. प्रश्न कौटुंबीक असो गाव गाड्या चा असो वादावादी भांडण-तंटा चा असो विकासकामांचा असो व्यापारी वर्गाचा असो शैक्षणिक आरोग्य सुविधेचा असो किंवा लाईट चा डीपी चा असो आज पर्यंत साहेबांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. जो जे वांछील तो ते देण्याचा प्रयत्न साहेबांनी प्रामाणिकपणे केला आहे.
सूक्ष्म नियोजन, संपूर्ण अभ्यास, सर्वधर्मसमभावाची भावना आणि मार्ग काढण्याची हातोटी साहेबांच्या कार्याचे गमक ठरले आहे. संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य, व्यापार, शेती, उद्योग अशा अनेक विषयांवर साहेबांनी दीर्घकाळ काम केले आहे. मागील वर्षी कोरोणामुळे जनता हैराण झाली. गोरगरिबांच्या जीवनावर संकट आले. अशावेळी साहेबांनी अन्नधान्यासह अनेक मार्गांनी मदतीचा हात देऊन त्यांना वर आणले आहे. लीमबोटी धरणाचा प्रश्न पंचवीस वर्षे प्रलंबित होता त्यासाठी आपल्या आमदारकीच्या काळात साडेपाचशे कोटींचा निधी आणून तो पूर्ण केला. किवळा, धोंड हे ही प्रकल्पासाठी कटीबद्ध आहेत.
नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी साहेबांचे प्रयत्न फळाला येत आहेत.
मुंबईला जाणे सुकर व्हावे म्हणून राज्यराणी एक्सप्रेस नांदेड हुन सुरू करण्यात त्यांनी यश मिळवले
परभणी मुदखेड दुहेरी मार्गाचे हे काम पूर्ण झाले आहे नांदेडला कार्गो हब व्हावा यासाठी काम चालू आहे. नांदेडचे वैभव असणारी एनटीसी मिल पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्नही नक्कीच यशस्वी होईल.
सर्व धर्मांना सोबत घेऊन त्यांच्या कल्याणासाठी काम करणे ही साहेबांची मनीषा सफल होत आहे. सबका साथ सबका विकास या धोरणापासून साहेब तसूभरही दूर नाहीत. माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भक्कम पाठिंब्यावर आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी व्यापारी नागरिक यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने साहेबांच्या कर्तृत्वाला आणखी झळाळी येवो आणि नांदेड जिल्ह्यातील समाजाच्या सर्व वर्गांसाठी कल्याणाचे, समृद्धीचे, भरभराटीचे मार्ग प्रशस्त होवो हिच साहेबांना वाढदिवशी शुभेच्छा.
सुनिल रामदासी
9423136441

COMMENTS