मुंबई दि.३० : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर,दरडी कोसळण्यातून सर्वत्र हाहाकार उडाला! या दुर्दैवीघटनेत जीवत हानी बरोबर मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे.राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या दुर्घटनेतील पीडितांना मदत करण्याचे आवाहन केले आहे! त्याप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी पुरपीडितांना मदत करण्याचे पाऊल उचलले.
त्या प्रमाणे राष्ट्रीय मिल मजदुर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाच्या संयुक्त विद्यमाने, महाड,चिपळूण,सांगली आणि कोल्हापूर मधील पूरपीडितांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या.या वस्तुंचे प्रत्यक्ष पुरपीडियांमध्यें वाटप करण्यात येणार आहे.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिनभाऊ अहिर म्हणाले,महाराष्ट्रातील संकटग्रस्तांना मदतीचा हात देणे,कामगार संघटनेने आपले नेहमीच कर्तव्यच मानले आहे.या अतिवृष्टीतून झालेली हानी दु:खाला अंत नसणारी असून आता मदतीचा ओघ चालू राहिला पाहिजे.ही मदत नव्हे तर कर्तव्य आहे,असेही
सचिन अहिर म्हणाले.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले,महाराष्ट्रातील दुष्काळ असेल,भुकंप किंवा पुरपीडित असतील त्यातील संकटग्रस्तांना मदतीचा हात देणे,संघटनेची पूर्वपारची परंपरा राहिली आहे.ती परंपरा संघटनेने कर्तव्यबुद्धीने पाळली आहे,असेही सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले.
या प्रसंगी खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ (अण्णा) शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे,राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्थेचे महाव्यवस्थापक विलास डांगे, कार्यालयीन सचिव मधूकर घाडी तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांगली,कोल्हापूर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सेक्रेटरी शिवाजी काळे,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे जिल्हा सचिव शाहरुख नायकवडी यांच्या आयोजनाखाली साहित्याने भरलेला एक टेंपो काल रवाना झाला असून,उपाध्यक्ष सुनिल बोरकर, सेक्रेटरी साई निकम यांच्या आ्य़ोजनाखाली मदत वाटपासाठी आज चिपळूण, महाड येथे दुसरा टेंपो रवाना झाला आहे.
★★★काशिनाथ माटल(प्रसिद्धी प्रमुख)

COMMENTS