धर्माबाद (अहमद लड्डा) तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापूर येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक पुंडलिक गोपतवाड हे आज नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण केल्याने सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून 33 वर्षे 7 महिने सेवा केली असून धर्माबाद तालुक्यातील मनूर येथील जिल्हा परिषद शाळेपासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी उमरी तालुक्यातील सिंगणापूर आणि वाघलवाडासह धर्माबाद तालुक्यात बाचेगाव, जिल्हा परिषद हायस्कुल धर्माबाद आणि शेवटी केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापूर याठिकाणी आपल्या सेवेतून विद्यार्थी घडविण्याचे काम केले.
बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव याठिकाणी 02 जुलै 1963 रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झाला असून प्रचंड मेहनत व अतिशय खडतर आयुष्यातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. ते उपक्रमशील शिक्षक असून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांचा आविष्कार करण्यासाठी प्रत्येक शाळेत त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. प्रत्येक शाळेत त्यांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. स्काऊट गाईड आणि कब बुलबुल उपक्रमात सहभागी होऊन धर्माबाद तालुक्याचे नाव त्यांनी जिल्हाभर प्रसिद्धीस आणले होते. लहान मुलांना अगदी प्रेमाने बोलून ते आपलेसे करतात म्हणून ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सेवा केली त्या त्या ठिकाणी ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवले आहे. त्याचबरोबर सहकारी शिक्षकांसोबत देखील आपुलकी आणि प्रेमाने बोलत असतात तसेच प्रत्येकांना सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा आपला मित्र परिवार खूप मोठा आहे. त्यांना वाचनाचे ही व्यासंग असून अधूनमधून ते वृत्तपत्र, साप्ताहिके, मासिके, पुस्तकं वाचत असतात.
मनमिळाऊ, प्रेमळ, आणि सहकारी वृत्तीचे पुंडलिक गोपतवाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एल. एन. गोडबोले, केंद्रीय मुख्याध्यापक संतोष नाईक, केंद्रप्रमुख नागोराव कमलाकर, सहकारी शिक्षक गंगाधर गंगुलवार, दत्तात्रय दारमोड, साईनाथ बोंदलोड, सौ. मनीषा पाठक, सौ. लीना सुपारे, श्रीमती बोडके, सौ. भुरे मॅडम, सौ. चाटे मॅडम, साईनाथ सायबलू, संतोष हेम्बाडे, नंदकुमार राजमल्ले, नागेश वरगंटवार, कृष्णा येरावार, सतीश कोटगीरे, मारोती गिरगावकर, शेख अहमद, गंगाधर बोमलवाड, देविदास नारमोड, चिल्लेवाड, शंकर गंडरोड, गंगाधर मदनुरकर, विकास जाकापूरे स्तंभलेखक नासा येवतीकर आणि उदय शिल्लारे आदींनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

COMMENTS