पालम तालुक्यातील चोरवड येथे कृषी महाविद्यालय,डोंगरशेळकी तांडा,उदगीर ता.उदगीर जि.लातूर येथील कृषीदूत वास्टर आकाश साहेबराव,याचे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि तसेच कृषी आधारित उपक्रम औद्योगिक 2021-22 कार्यक्रमासाठी नियोजन केलेले होते,त्यांच्या शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी जरी असलं तरी त्यांच्या संवाद मराठीतून कसा साधावा हे चांगल्या प्रकारे पटवून देत असताना.!
येथील अनेक शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांच्या शेतातील सध्या घेत असलेल्या पिकाची सविस्तर माहिती घेतली आणि येत असलेल्या समस्या ह्याही विचारपूस केल्या.ह्या प्रसंगी गावचे आदर्श शेतकरी श्री.धर्मराज कदम,बंडू हाके,चोपडे गंगाराम,बालाजी वास्टर,प्रसाद माने व ग्रामपंचायत सदस्य इत्यादी उपस्थित होते.
तसेच हा कृषी क्षेत्राशी संलग्नित कार्यक्रम कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर चे प्राचार्य डॉ.ए.एम.पाटील, उपप्राचार्य डॉ.एल.व्ही.पिंपळपल्ले,कार्यक्रम समन्वयक डॉ.जी.बी.अडसुळ,कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.डफडे,प्रा.ए.एल.खरे,प्रा.व्ही.एल.सोमवंशी,प्रा.पि.एस.राठोड,प्रा.एस बी.माने यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.!ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत शेतातील विविध समस्या व निरसन,माती परीक्षण,जलसंवर्धन,पिकावरील कीड,तसेच रोग व विविध नवीन शेतीविषयक संकल्पना यावर शेतकऱ्यांना स्वतः भेट देऊन ,त्यांच्याशी संवाद साधुन,त्यांच्याशी हितगुज करणार आहेत.

COMMENTS