नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' परिसरातील 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने २९ जुलै रोजी गरोदर माता तसेच स्रियांच्या विविध आजारांची तपासणी करण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
नांदेडच्या 'सिडको' परिसरातील डॉ. केळकर हॉस्पिटल बिल्डिंगमधील 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुरुवार दि. २९ जुलै रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात स्रिरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. जयसिंग, डॉ. विरेश बिराजदार, डॉ. माधूरी शेळके व डॉ. भास्कर औराळकर तसेच त्यांचे अन्य सहकारी डॉक्टर मंडळी हे सिडको-हडको परिसरातील गरोदर माता तसेच अन्य महिलांच्याही विविध आजारांविषयीची तपासणी करणार आहेत.
विशेष म्हणजे, 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने २९ जुलै रोजी नांदेडच्या 'सिडको' परिसरातील डॉ. केळकर हॉस्पिटलच्या बिल्डींगमध्ये सिडको हडको भागातील सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने तसेच नाममात्र फिसमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात स्त्रिरोग व प्रसुतीशास्त्र विशेष डॉ. जयसिंग, डॉ. बिराजदार व डॉ. माधुरी शेळके तसेच त्यांचे अन्य सहकारी डॉक्टर मंडळी गरोदर माता तसेच अन्य महिलांच्यादेखील विविध 'आरोग्यविषयक समस्या' या विषयावर मार्गदर्शनही करणार आहेत. दरम्यान, मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचारसुध्दा मोफत करण्यात येणार आहे. या मोफत शिबिराचा सिडको तसेच हडको परिसरातील बहुसंख्य महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या शिबिराचे मुख्यआयोजक डॉ. भास्कर औराळकर व समन्वयक प्रविण सोनसळे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी केले आहे.



COMMENTS