*मस्साजोग प्रतिनिधी*
*युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे यांची बहिण कु.रुपाली रोडे यांचा विवाह बीड तालुक्यातील*वाकनाथपुर येथील श्री.नारायण गांडगुळे यांच्या बरोबर दिनांक - ४ मे मंगळवार रोजी पंचवीस नातेवाईकांच्या उपस्थितीत करण्यात आला*
या बाबत अधिक माहिती अशी बीड जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे तात्या रोडे यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून अगदि साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.या विवाह सोहळ्यामध्ये होणाऱ्या खर्चाचा अपव्यय टाळण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख आदरणीय रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होऊन युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे यांनी वडील तुकाराम रोडे व आई शिलाबाई रोडे यांच्याशी चर्चा करुन वृद्धाश्रमाला दहा हजार रुपयांचा किराणा देऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बहिणीचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे यांनी निराधार वृद्धांसाठी दहा हजार रुपयांचा किराणा,सॅनिटायजर,मास्क घेऊन कळसंबर येथील आपला वृद्धाश्रम येथे जाऊन मनिषा पवार यांच्याकडे सुपूर्द केला
यावेळी आपला वृद्धाश्रम येथे मदत देताना युवासेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात,युवानेतृत्व अनिकेत शिंदे,अभिजीत घुले,आदित्य अंधारे,ऋषी घुले,प्रशांत मुरकुटे,प्रविण गाढवे,सचिन सौदागर तसेच आपला वृद्धाश्रमाच्या संचालिका मनिषाताई पवार सह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

COMMENTS