नांदेड.(विशेष प्रतिनिधी) बळीरामपूर येथील एका १७ वर्षीय युवतीस फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण ठाण्यात अखेर दोन मे रोजी आरोपी तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बळीरामपूर येथील एका अल्पवयीन युवतीचे वडील ३० एप्रिल रोजी रात्री साडेनऊचेदरम्यान, घरातील एका खोलीत टी. व्ही. पाहत होते. त्याचवेळी, युवतीची आई घरात झोपली होती. वडील घरात टीव्ही पाहत बसल्याची व आई झोपली असल्याची संधी साधूनच उपरोल्लेखित 'युवती' ही घरातील कुणालाही कांही न सांगता घरातून निघून गेली आहे.
दरम्यान, उपरोल्लेखित अल्पवयीन युवतीच्या आई व वडिलांनी तिचा बळीरामपूर परिसरासह सर्व नातेवाईक व मित्रमंडळीकडे सर्वत्र शोध घेतला. मात्र,अल्पवयीन युवती ही कुठेही आढळून आली नाही.
विशेष बाब म्हणजे, सदरील युवतीच्या आई व वडीलांनी २०१९ मध्ये त्यांच्या अल्पवयीन युवतीला शिक्षणाकरिता नांदेड येथील पाहुण्यांच्या घरी ठेवले होते. त्यावेळी, नांदेडच्या 'शिवाजी'नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी अभिजित धुमाळे नावाच्या तरूणाने उपरोक्त अल्पवयीन युवतीस फूस लावून पळवून नेले होते. उपरोक्त अल्पवयीन युवतीच्या वडिलांनी त्यावेळी, दिलेल्या तक्रारीचेआधारे नांदेडच्या शिवाजीनगर ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यावेळी त्यानेच आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेला असावा, असा संशय आल्याने मुलीच्या वडिलांनी त्याचे घर गाठले. मात्र, आरोपी अभिजित व त्याची काळ्या रंगाची पल्सर गाडीपण घरी नसल्याचेही त्याच्या आई-वडिलांनी उपरोक्त मुलीच्या वडिलास सांगितले.
एकूणच, आरोपी अभिजित धुमाळे (रा. नांदेड) याने पुन्हा आपल्या मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून त्याच्या पल्सर दुचाकीवर बसवून पळवून नेले आहे, असा आरोप वडिलांच्या तक्रारीतमध्ये नमूद असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते व मदतनीस पो.कॉ. जनार्दन महाले यांनी दिली आहे.
याप्रकरणी उपरोल्लेखित युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीआधारे अखेर नांदेड ग्रामीण ठाण्यात २ मे रोजी दुपारी आरोपी तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गणेश होळकर हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS