नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
सध्या समाजात जातीय तढे निर्माण करण्याचा काही समाजकंटकाकडून प्रयत्न केला जातो व यातूनच जातीय तेढ निर्माण होतो; परंतु आता सुज्ञ हिंदू-मुस्लीम बांधव यांच्या अफवाना बळी न पडता आपले सण व उत्सव एकत्र करतात हे उच्च समाजिक विचार घेऊन मुखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती व भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते बालाजीराव पाटिल अंबुलगेकर यांच्या तर्फे अंबुलगा (बु) येथील मुस्लिम बांधावासाठी या रमजान च्या पवित्र महिन्यात प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही अन्न-धान्य सोबत दैनंदिन जिवनात उदरनिर्वाहासाठी आवश्य असलेले साहित्य वाटपाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते .यावेळी गंगाधर पाटिल अंबुलगेकर यांच्या हस्ते मुस्लिम बांधवाना या किट चे वितरण करण्यात आले. यावेळी अंबुलगा नगरीचे सरपंच प्रतिनिधी हुल्लाजी मामा रॅपनवाड, उपसरपंच शरद पाटील ,अंबुलगा ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य व सदस्याचे प्रतिनिधी, जेष्ठ नागरिक नागनाथ गुरुजी देशटवाड ,सतीश पाटील, पोलिस पाटिल विट्ठलराव कौरवाड ,अंबुलगा येथील प्रतिष्ठित व्यापारी बाबू सावकार उलीगडे ,सतीश सावकार मोतेवार, तुकाराम मंत्रे, सलीमसाब कुरेशी, रसूलसाब शेख , इसाखसाब कुरेशी , गौससाब कुरेशी , महेबूबसाब कुरेशी , बजरंग पाटिल पांढरे ,अहेमद पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गावातील सर्व मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.यावेळी गंगाधर पाटिल अंबुलगेकर यांनी सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या .

COMMENTS