राम दातीर
माहुर (प्रतिनिधी ) कोरोनामुळे निर्माण झालेल्या महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे.मोठमोठ्या दवाखान्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे.त्यामुळे शासकीय रक्तपेढीमध्ये निर्माण झालेली रक्ताची मोठी कमतरता सर्वस्तरातील रुग्णाच्या जिवावर बेतू शकते हीबाब हेरून वाई बाजारला शिवसेनेची युवासेना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या संयुक्त विद्यमाने दि.6 मे रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सध्याची निकड लक्षात घेवून युवकांनी त्यात मोठया संख्येने सहभाग घेवून रक्तदान करावे असे आवाहन युवासेनेचे नेते यश खराटे यांनी केले आहे.
काही दिवसानंतर १८ वर्षावरील सर्वांनाच कोवीड प्रतिबंधक लस दिली जाणार असल्याने पुढील ६० दिवस त्यांना रक्तदान करता येत नाही.त्यामु़ळे अधिक प्रमाणात रक्ताचा तुटवडा पडणार असल्याच्या धर्तीवर शिवसेनेची युवासेना व प्रहार जनशक्ती या पक्षाच्या वतीने वाई बाजार येथील आठवडी बाजारात दि. ६ में रोजी स. ८ ते दु. १ वाजे पर्यंत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमजद खान यांनी दिली आहे.

COMMENTS