प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली शहरातील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर शनिवारी सकाळी जिल्ह्यातील सर्व ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क व सेनिटायझर चे वाटप जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरीक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी कर्तव्य बजावतांना स्वतः च्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू असुन भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत ही पोलिस अधिकारी कर्मचारी चोविस तास रस्त्यावर उभे आहेत. महाराष्ट्रात अनेक पोलिस अधिकारी कर्मचारी यांना अपले कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांचा म्रुत्यु झाला आहे. यामुळे कर्तव्य बजावताना सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियमीत मास्क चा उपयोग करून सुरक्षितता बाळगावी व कोरोना पासुन स्वतः चा बचाव करावा. असे जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले आहे. तसेच कोरोना काळात आपले कर्तव्य बजावण्या संदर्भात काही मार्गदर्शक सुचना दिल्या. व सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी यांना मास्क व सेनिटायझर चे वाटप केले. यावेळी उपाधिक्षक वाखारे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, यांच्या सह जिल्ह्यातील तेराही ठाणेदारांची उपस्थिती होती.

COMMENTS