*
सोनपेठ/प्रतिनिधी
कोरोना आजाराच्या निर्मूलनासाठी ग्रामीण भागातही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशाची कडक अमलबजावणी करण्यात येत असून सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या वतीने या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.यासाठी युवासेनेचे तालुकाप्रमुख तथा सरपंच रामेश्वर मोकाशे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.पूर्वीपासूनच शासनाच्या आदेश,निर्णय तसेच विविध प्रकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मोकाशे कार्यरत राहतात.जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी राबवलेल्या सर्व उपाययोजनाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी कान्हेगाव ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचे मोकाशे यांनी यावेळी सांगितले.
*काही गावातुन पालक अधिकारी गायब*
मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी सरपंच या आदेश आला केराची टोपली दाखवत असल्याची दिसून येत आहे.त्यातच नेमणूक करण्यात आलेले पालक अधिकारी गावांमध्ये येत नसल्याने गावामध्ये सर्व व्यवसाय चालू असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS