नायगांव /प्रतिनिधी
सोमठाणा ते कोलंबी परिसरात पत्ते खेळत असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत माहिती कुंटूर पोलिसांना मिळाल्या वरून पोलिसांनी सापळा रचून जुगार अड्ड्यावर धाड टाकून नगदी १४,२०० रुपये ३ दुचाकी ज्याची किंमत १ लाख ४० हजार असे एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरोधात सिंघम सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम पठाण याच्या फिर्यादीवरून जुगार खेळणाऱ्या सहा जनावर कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सध्या जिल्ह्यासह नायगांव तालुक्यात कोरोना म्हणारीने धुमाकूळ घातला असल्याने नागरिक भयभीत होऊन घरातच दडून बसले आहेत. जुगार्यांनी मात्र लॉकडाऊन व सोशल डिस्टिंग ची ऐसी की तैसी करून , राजरोसपणे जुगार सोमठाणा,कोलंबी,
नायगांव शिवारातील रोडवर पत्ते खेळत असताना एका खबर्याने गुप्त माहिती दिल्यावरून कुंटूर ठाण्याचे सपोनि करीम पठाण यांनी जीवाची पर्वा न करता स्वतःच जीव धोक्यात टाकून या जुगाऱ्यामुळे दुसऱ्यांना कोरोना प्रार्दुभाव होऊ नये म्हणून सिंघम सपोनी करीम पठाण व त्यांचे सहकारी पोहेकॉ. पोले ,पोहे.कॉ.उलगूडवाड ,पोहे.कॉ.सदाशिव पाटील ड्रायव्हर, होमगार्ड राठोड,कदम या सर्वाना सोबत घेऊन सोमठाणा,कोलंबी ,नायगाव परिसरातील रोडवर पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना दिनांक २१ एप्रिल रोजी सांयकाळी छापा मारून सहा जुगाऱ्याना ताब्यात घेऊन त्याच्याकडून १,५४,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जुगाऱ्यावर विरोधात कलम १२ (अ) मुंबई जुगार कायद्या प्रमाणे दिनांक २० एप्रिल रोजी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ.पोले हे करीत आहेत.
COMMENTS