अवैध गुटख्यावर Ips यतीश देशमुख यांची कारवाई

प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली हिंगोली शहरात सुरू असलेल्या अवैध गुटख्यावर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी गुप्त माहिती वरून कारवाई...


प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली

हिंगोली शहरात सुरू असलेल्या अवैध गुटख्यावर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी गुप्त माहिती वरून कारवाई करत 3 लाखांचा गुटखा जप्त केला असुन या कारवाई ने शहरात खळबळ उडाली आहे. नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी परिक्षत्रातील जिल्ह्यात अवैध धंदे खपुन घेणार नाही अशा कडक सुचना पोलिस प्रमुखांना देऊनही हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच आहेत. जिल्ह्यात अवैध मटका, अवैध गुटखा, अवैध वाळू वाहतुक, अवैध दारूविक्री  बरोबरच, आँनलाईन लाँटरीसह आयपीएल चा सट्टा ही सुरू असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. आजुबाजुंच्या जिल्ह्यात लाँकडाऊन च्या काळात  हिंगोली जिल्हातुन अवैध दारू सप्लाव होत आहे. याचे उदाहरण म्हणजे वसमत ग्रामीण पोलिसांनी वसमतवरून नांदेड जिल्ह्यात अवैध दारूची वाहतुक करतांना पंधरा दिवसापुर्वी मोठी कारवाई केली होती. यावरून स्पष्ट होत आहे.11 एप्रिल रोजी आयपिएस यतीश देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे पथकाने रात्री पावनेदहा वाजता तलाबकट्टा भागात सागर माने यांच्या घरी छापा टाकून 12 पोते शासनाने बंदी घातलेला गुटखा पानमसाला एकुन 3 लाख 30 हजार रूपये किंमतीचा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी हिंगोली चे आमदार तानाजी मुटकूळे यांनी जिल्ह्यधीकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील अवैध मटका, गुटखा व वाळू वाहतुक थांबविण्याची मागणी केली होती परंतु तरी सुद्धा जिल्ह्यात अवैध धंदे चोरी छुपे सुरूच आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाच्या कारवाया रोजच जिल्ह्यात सुरू आहेत. तरीसुद्धा जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच आहेत. आयपिएस यतीश देशमुख यांच्या कारवाई ने अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

*शहरात अवैध धंदे खपवून घेणार नाही- देशमुख*

हिंगोली शहरात कुठलेही अवैध धंदे खपवून घेणार नाही. अवैध धंद्याची माहिती असल्यास मला फोनवर कळवावे माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन हिंगोली जिल्हयाला लाभलेले यंग आयपिएस अधिकारी यतीश देशमुख यांनी केले आहे. यतीश देशमुख यांंचा कारवाई ची धडक मोहीम सुरूच असुन यापुढेही कारवाई ची मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group