नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
एज्युकेशन सोसायटी नायगांव (बा) संचलित जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नायगाव येथे माजी राज्यमंत्री कै. गंगाधरराव कुंटुरकर याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मा. राज्यमंत्री
कै. गंगाधरराव कुंटुरकर हे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक होते. संस्थापक अध्यक्ष मा. आ.कै. बळवंतराव पाटील चव्हाण यांच्यासोबत एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत त्याचा पुढाकार होता. त्याच्या दुःखद निधनाने एज्युकेशन सोसायटी नायगाव परिवारावर शोककळा पसरली आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य केशवराव सुर्यवंशी यांनी केले.
प्रा. पी. डी. जाधव बारूळकर यांनी कै. गंगाधरराव कुंटुरकर याच्या राजकीय कारकीर्द बद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. प्रभाकर पवार,पर्यवेक्षक प्रा. गणेश देवडे, उपमुख्यध्यापक साहेबराव जाधव, पर्यवेक्षिका प्रा.सौ.शोभा शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS