*(केजचे तहसीलदार मेंढके फौजफाट्यासह ऊतरले स्त्यावर.!)*
मस्साजोग प्रतिनिधी-अनंत जाधव
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे रूग्न झपाट्याने वाढत असून त्यातच लॉकडाऊनही आता बंद करुन शासनाने कठोर निर्बंध लावले असले तरी जनता त्याला न जुमानता विना मास्क ज्याला जसे जमेल तसे अगदी बिनधास्त पणे केज शहरात फिरत आहेत.
त्यामुळे शहरात लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणावर गर्दीने केज शहर गजबजून जात असल्याने केजची प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून जनतेच्या हितासाठी स्वतः केजचे तहसीलदार मा.मेंढके साहेब रस्त्यावर उतरले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की कोरोना महामारीने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार ऊडवला असुन या आजाराचे रूग्न बिड जिल्ह्यात दररोज दुप्पटीने व तिप्पटीच्या पट्टित हजारा जवळ जात असुन केज तालुक्यातही त्याची संख्या झपाट्याने वाढून शंभरी गाठत आहे. जिल्हाधिकारी मा. रविंद्र जगताप यांच्या आदेशानुसार २६ मार्च ते ४ एप्रिल या काळात संपूर्ण जिल्ह्यात दहा दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र या लॉकडाऊनला जनतेने फारसे गांभिर्याने न घेता बंद काळातही हौसे नौशे मोकाटपणे फिरत होते. त्याचा परिणाम आज पहायला मिळत असुन केज तालुक्यात कोरोना या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनच्या कालावधीनंतर दि.५.एप्रिल रोजी लॉकडाऊन संपला असल्याची माहिती प्रशासनाने दिल्याने सर्वसामान्य व्यक्ती, व्यावसायिक, व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दहा दिवस विविध प्रकारच्या खरेदीसाठी तरसलेल्या जनतेने केज शहरात परवा व काल एकच गर्दी केल्याने वातावरण जणु कोरोना विरहित असल्याचे जानवले. त्यातच एस.टी.महामंडळाकडून बसेस देखील सुरू करण्यात आल्या असल्याने दहा दिवसापासून ओस पडलेले केजचे बसस्थानक आता गजबजून गेले आहे.. या साऱ्या भांबड घाईत,मोकाटपणे फिरणाऱ्या कैकांनी मास्क घातलेले दिसले नाहीत. त्यामुळे याआम जनतेला कोरोना महामारीची किती भीती आहे. हे लक्षात आले. शहरात सर्वच दुकाने , हॉटेल्स, प्रवासी वाहतूक या बाबी आनंदाने सुरू झाल्या होत्या. परंतु हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. कारण दुपारच्या कोरोना च्या रिपोर्टिंग मध्ये कोरोनाच्या रूग्नसंख्येत दिडपटीने वाढ झाल्याचे मा.जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आल्याने व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. म्हणून मंगळवार पासुन पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला असुन त्याची सर्वत्र कडक अंमलबजावणी होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.म्हणून मंगळवार या दिवशी केजचा आठवडी बाजार असल्याने मंगळवारी सकाळी केज शहरात भाजी विक्रेत्यांनी केज बिड या मुख्य रस्त्यावर बस्थानकासमोर नव्याने तयार होत असलेल्या रस्त्यावर बाजार भरवला मात्र केजचे तहसीलदार यांनी व केज नगरपंचायतचे अधिकारी यांनी संयुक्त रित्या मोहीम राबवित बाजार हाटवण्याचा प्रयत्न केला.परंतु भाजी विकण्यासाठी खेड्यातील शेतकरी आल्याचे पाहून मा.तहसीलदार यांनी शेतकरी आणि ग्राहक यांचे हित लक्षात घेवुन त्यांनी या बाजाराला चार वाजेपर्यंतची सवलत दिल्याने बाजार जोरात सुरु होता. मात्र चार नंतर गर्दी वाढत असल्याचे पाहुन केजचे तहसीलदार मा.दुलाजी मेंढके यांनी नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्यसह केज नगरपंचायतचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे बाजार बंद करण्याचे अवाहन करत स्वतः तहसीलदार मेंढके साहेब यांनी रस्त्यावर ऊतरून भाजीपाला विक्रेत्यांना समज देत बाजार तात्काळ बंद केला त्यामुळे गर्दी आपोआप कमी झाली. तसेच या वेळी विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. या वेळी केजचे तहसीलदार मा दुलाजी मेंढके साहेब , नायब तहसीलदार सचिन देशपांडे , नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी सय्यद अनवर ,नगर पंचायत अभियंता हाजबे साहेब,लिपिक खुरेशी , नगर रचना सहाय्यक पोटे साहेब, शिपाई सय्यद आदिक यांचेसह केज पोलीस स्टेशनचे पो.ना.आघाव व पो.कॉ.तांदळे व आदी कर्मचारी हजर हो
केज तालुक्यातील कोरोना आजाराचे रूग्न झपाट्याने वाढत असून जनतेने आता स्वतः च काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे. भाजीपाला विक्रेत्यांनी बाजार किंवा मंड ई अशा पध्दतीने न विक्री करता मास्क लावून आणि सामाजिक अंतर ठेवून गल्लीत फिरून विकावे. व शहरात १४४ कलम लागु असुन शहरात विनाकारण कोणीही गर्दी करु नये.
....मा.दुलाजी मेंढके , तहसीलदार, केज

COMMENTS