प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली व कळमनुरी तालुक्यात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत आहे. मात्र याठिकाणी असलेल्या कोविड सेंटरची अत्यंत दुरावस्था झालेली असुन कोरोनाग्रस्त रूग्णाना व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कोविड सेंटरची दुरावस्था न सुधारल्यास ना ईलाजाने प्रशासना विरूद्ध उपोषण करण्याचे निवेदन माजी आमदार तथा भाजपा नेते गजानन घुगे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, कळमनुरी येथे 100 बेडचे कोवीड सेंटर असुन कोरोना ग्रस्त रूग्णसंख्या 125 आहे. प्रतेक कोविड सेंटरला 1 भूलतज्ञ,1 फिजीशीयन, 1 एमडी डॉक्टर असने आवश्यक आहे. मात्र कळमनुरी येथे एकच डॉक्टर असुन त्यांची प्रतिनियुक्ती हिंगोली येथे करण्यात आली आहे. त्यामुळे येथे चार रूग्णांचा म्रुत्यु झाला आहे. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापुर परिसरात आदिवासी व दुर्गम गावे असल्यामुळे बाळापुर येथे ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती केली आहे मात्र या ठिकाणी कोवीड सेंटर ची सोय नाही. त्यामुळे डोंगरकडा, वारंगा, आखाडा बाळापुर, या परिसरात दहा च्यावर रूग्णाचा म्रुत्यु झाला आहे. हिंगोली जिल्ह्य सामान्य रूग्णालयात रेमडिशीवर ईंजेक्शन उपलब्ध असुन सुद्धा जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेल्या कोवीड सेंटरला ईंजेक्शन चा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे रूग्णाला बाजारातुन चढ्या दराने ईंजेक्शन खरेदी करावे लागते. तसेच गुरूवारी रात्रभर जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याबाबत तक्रारी येत होत्या. 12 एप्रिल पर्यंत कळमनुरी येथील कोविड सेंटर मध्ये भूलतज्ञ, फिजीशीयन व एमडी डॉक्टरची नियुक्ती न केल्यास कोविड सेंटरची दुरावस्था न सुधारल्यास नाईलाजाने कळमनुरी येथील कोविड सेंटर समोर उपोषण करण्याचा ईशारा कळमनुरी चे माजी आमदार गजानन घुगे यांनी दिला आहे.

COMMENTS