प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत शहरातील नागरिक व आंबेडकर जयंती समीतीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी कोरोनाच्या धरतीवर रक्तदान सारखे सामाजीक उपक्रम राबऊन डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली अर्पण करा असे आवाहन केले आहे. भारत रत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने जयंती उत्सवाला काही निर्बंध लावले आहेत. डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी साजरी करण्यात येते मात्र सध्या कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेत उदभवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व वाढत्या कोरोना रूग्णाच्या संखेचा विचार करता महसुल व वनविभाग, अपत्ती व्यवस्थापण मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशानुसार यावर्षी आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देश बैठकित वाचून दाखवत सुचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी केले आहे. तसेच कोरोना मुळे जिल्ह्या सामान्य रूग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करून व अन्य सामाजीक उपक्रम राबवून डाँ. बाबासाहेबांना अभिवादन करावे असे आवाहन यतीश देशमुख यांनी बैठकीत केले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंबेडकर जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करावी, यावर्षी प्रभातफेरी, बाईक रैली, मिरवणूक काढू नये. फक्त प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून पाच पेक्षा अधिक व्यक्ती न जमवता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत जयंती साजरी करावी असे यतीश देशमुख यांनी सांगितले. बैठकिस शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक पंडित कच्छवे, डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समीतीचे अध्यक्ष मांजरमकर, अमीत काळासरे, प्रा.बलखंडे यांच्या सह जयंती महोत्सव समीतीचे पदाधिकारी व पोलिस अधिकारी, पत्रकारांची उपस्थिती होती.

COMMENTS