प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहोली बुद्रुक गावामधे 22 मार्च च्या रात्री घरफोडीची घटना घडली होती. ज्यामध्ये सोन्या, चांदीच्या दागिन्यासहीत रोख रक्कम असा 2 लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण चे ठाणेदार बळीराम बंदखडके यांच्या पथकाने अठवडाभरातच तीन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या कडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुली बु येथील किशन मारोती जावळे यांच्या घरी 22 मार्च च्या रात्री घराचे कुलूप तोडून घरातील लाँकर मध्ये ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण 2 लाख रूपायांचा मुद्देमाल चोरी झाला होता. याप्रकरणी किशन जावळे यांच्या फिर्यादी वरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत मोठ्या शिताफीने व गुप्त खबरीवरून अठवडाभरातच चोरीतील एका आरोपीस हिंगोली शहरातुन ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हयाची कबुली दिली.दुसरा आरोपी मुंबई येथुन ताब्यात घेतला या घरफोडीतील तीनही आरोपींना ताब्यात घेतले असुन त्यांच्या कडुन 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलिस अधिक्षक राकेश कलासागर,अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, ग्रामीण चे उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण चे ठाणेदार बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, जमादार गजानन पोकळे, रवि हरकाळ, शेख महम्मद, धामणे यांच्या पथकाने अठवडाभरातच आरोपींच्या मुसक्या आवळून घरफोडीचा गुन्हा उघड केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.. या आधीही ग्रामीण पोलिसांनी सुराणानगर भागातील सशस्त्र दरोडा प्रकरणाचा तपास आवघ्या 48 तासात लाऊन आरोपींच्या मुसक्या आवळत दरोड्यातील 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर दाटेगाव शिवारातील आरोपींच्या दोन दिवसात मुसक्या आवळत खुनाचा तपास लावला होता. यानंतर आता घरफोडीचा आठवडाभरातच तपास लावत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कमगिरीबद्दल पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी ग्रामीण चे ठाणेदार बंदखडके यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.

COMMENTS