माजलगाव/प्रतिनिधी
संस्थेमधील कर्मचारी यांनी शासनाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार काम करताना देखील जे कर्मचारी कोरोणा संक्रमित झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांची कोणतीही पगार कपात न करता उपचारासाठी रजा देण्यात येत असून त्यांना रक्कम रुपये 10000 प्रत्येकी आर्थिक मदत देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री आर जी कानडे यांनी सांगितले.
संस्थेने मागील वर्षात व यावर्षी देखील कोरोणा लाटेमध्ये सर्व कर्मचारी यांची लॉकडाउन काळातील पगार कपात केला नाही ..
तसेच संस्थेने नवीन कर्मचारी भरती राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.
तरी, संस्थेच्या खातेदारांसाठी या कठीण काळात देखील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी इतर संस्थांनी देखील श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचा आदर्श समोर ठेवून आपल्या संस्थेतील
कोरोणाग्रस्त कर्मचारी यांना आर्थिक मदत द्यावी व बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवावे आणि शासनाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार गर्दी टाळावी असे आवाहन अध्यक्ष श्री आर जी कानडे यांनी केले आहे.

COMMENTS