------------------------------------------
नांदेड- स्नेहा नगर पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलीस आमलदाराच्या मुलाने भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एटीएम मध्ये दुसऱ्या नागरिकाचे विसरलेले पैसे परत केले. या प्रामाणिकपणाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
अमिरोद्दिन अशरफोदिन फारुकी रा. स्नेहा नगर पोलीस वसाहत असे पैसे परत केलेल्या पोलीस पाल्याचे नाव आहे. आमिर हे दि. 16 रोजी पोलीस कॉलनी समोरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना यापूर्वीच एटीएम मधून बाहेर आलेले पंधराशे रुपये मिळून आले. त्यांनी बराच वेळ तिथे थांबून पैसे असणाऱ्या ची प्रतीक्षा केली. पण कोणीही परत न आल्यामुळे त्यांनी थेट भाग्यनगर पोलिस ठाणे गाठून तेथील पोलिस निरीक्षक अभिजीत साळुंखे यांना पैसे परत केले. यावेळी स्नेह नगर पोलीस कॉलनी चे इन्चार्ज उद्धव घुले, अमलदार विलास बाबर यांच्यासह आधी जण उपस्थित होते.

COMMENTS