*गावातील सर्व ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिला कांबळे यांचे आवाहन.*
*अनंत जाधव/मस्साजोग*
*राज्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे तरी कोरोनाने आता मस्साजोग सारख्या ग्रामीण भागात देखील पाय पसरले आहे.*
तरी याबाबत ची अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील मस्साजोग गावांमध्ये दिनांक १७ एप्रिल शनिवार रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत चौथा रॅपिड ऑन्टिजन चाचणीचा कॅम्प घेण्यात आला त्यात एकुण १०० जणांच्या रॅपिड आॅन्टिजन चाचण्या करण्यात आल्या व त्यात १०० पैकी ९ जणांना कोरोनाची लागण झाली तर ९१ जणांच्या रॅपिड ऑन्टिजन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत आता मस्साजोग येथील कोरोना बाधिताची एकुण रूग्ण संख्या ६१ वर पोहोचली आहे तरी नागरिकांनी सतर्क राहून व मास्क व सॉनिटायझरचा वापर करून व विनाकारण घराच्या बाहेर पडु नये व नागरिकांनी स्वाताहाची काळजी घेण्याचे आवाहन विडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शिला कांबळे व सरपंच संतोष अण्णा देशमुख यांनी केले आहे व या कॅम्प मध्ये उपस्थित समुदाय आरोग्य अधिकारी डॉ मुळे सर
आरोग्य सेविका श्रीमती थोरात
, श्री देशमुख ,आरोग्य सेवक श्री मोरे ,आशा कार्यकर्ती श्रीमती सोनवणे ,मदतनीस श्रीमती शेख , अतुल दसपुते उपस्थित होते

COMMENTS