धर्माबाद (प्रतिनिधि)
महाराष्ट्रातील कोरोना चा उद्रेक पाहता जनता भयभीत होत आहे.
धर्माबादला ही नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर धर्माबादला ही कडकडीत संचारबंद ठेवण्यात आले.
धर्माबादेला हि शुक्रवारी दि.9 एप्रिल 2021रात्री 8=00 पासून ते सोमवारी11 एप्रिल सकाळी 7=00 वाजेपर्यंत (विकेन लाॅकडाऊन) महाराष्ट्र शासना तर्फे संचारबंदी लागू केली आहे .
कोविड 19 कोरोना ची दुसरी लाट रोखण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करावा व शासनाला सहकार्य करावे व खालील प्रमाणे सुविधाही देण्यात आली आहे.
औषधी व वैद्यकीय सेवेची वगळता सर्व प्रकारची दुकाने बाजारपेठ पूर्णतः बंद राहणार आहे .
केवळ अत्यावश्यक तसेच मर्यादित शासकीय सेवेची वाहने सुरू राहणार असून त्याच वाहनांना पेट्रोलपंपावर इंधन आणि गॅरेजवर दुरुस्ती करता येईल .
शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व धर्माबाद तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. बन्नाळी, बेल्लुर व बिद्राळी येथील आंतरराज्य पोलिस चौकीही कार्यरत आहे.गावातून व चौका चौकातून पोलिसांची गस्त (पेट्रोलियम) चालू आहे. विकेन लोकडॉन असल्यामुळे 40 'अंश सेल्सियस तापमानात कर्तव्य करणारे कर्तव्यदक्ष धर्माबाद चे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रमजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, ASI साहेबराव निलेवाड, पो.काॅ. संतोष आनेराव, गुप्त खात्याचे पठाणजी , बालाजी नागमवाड, भीमराव रेणके, ट्राफिक पोलीस माधवराव पाटील व सर्व पोलिस कर्मचारी महसूल व न.पा. चे कर्मचारी कार्यरत आहेत , सर्व नागरिक संचार बंदीच्या काळात शासनाला सहकार्य करीत असल्याचे दिसत आहे.

COMMENTS