सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथे दलित तरुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तयारी करत असताना त्यांच्या जागेवर सायखेडा येथील सहा जणांनी येऊन जयंती कार्यक्रम करू देणार नाही म्हणून जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दलित तरुणांनी सदर जागा आमची असून आम्ही या जागेवर मागील पंचवीस वर्षांपासून जयंती साजरी करत आहोत असे म्हंटले असता सदरच्या लोकांनी दलित तरुणांना जातीवाचक शिवीगाळ करत त्यांचे डोके फोडून जखमी केल्याची घटना सायखेडा येथे घडली आहे.यावरुन सायखेडा येथील धम्मानंद गौतम उजगरे यांच्या फिर्यादीवरून संतोष धोंडिबा कोंडलवाडे,बद्रीनाथ बालासाहेब कोंडलवाडे,बालासाहेब कोंडलवाडे,राम कारभारी कदम, शरद मधुकर कदम,दिगंबर भगवान कदम यांच्याविरुद्ध भादवी नुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार विविध कलमे तसेच१४३,१४७,३२३,३२४,५०४,५०६,२९५अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने करत आहेत.


COMMENTS