*अनंत जाधव/मस्साजोग*
*कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दहा हजाराच्या जवळपास गेला आहे. कोरोनाने आता मस्साजोग सारख्या ग्रामीण भागात * देखील पाय पसरले आहे.*
तरी याबाबत ची अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील मस्साजोग गावांमध्ये चक्क एका आठवड्यात बेचाळीस कोरोनाची लागण झालेले रूग्ण आढळून आले आहेत तरी मस्साजोग येथील नागरिकांना कसल्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याने नागरिक हे बस स्टॅण्ड वर व गावांमध्ये विनामास्क फिरत असल्यामुळे मस्साजोग गाव हे कोरोना सारख्या महामारीचे हॉटस्पॉट बनले असून मस्साजोग येथे अजून कोरोना संसर्ग रोगाची रूग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे तरी मस्साजोग येथील सर्व नागरिकांचे स्वॉब घेऊन कोरोनाची आॅन्टिजन टेस्ट करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे तरी केज तहसीलदार दुलाजी मेंडके साहेब व केज तालुका आरोग्य अधिकारी विकास आठवले साहेब यांनी लक्ष्य देण्याची गरज आहे दिनांक ९ एप्रिल कोरोनाची ३ रूग्ण संख्या आढळून आले तर १० एप्रिल रोजी ३ रूग्ण संख्या तर दि .११ एप्रिल रोजी ३ रुग्ण संख्या ,दि. १२एप्रिल रोजी ७ रुग्ण संख्या तर ,दि .१३ एप्रिल रोजी ६ रुग्ण संख्या तर दि १४ एप्रिल रोजी ९ रुग्ण संख्या व दि १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत १०६ जणांच्या आॅन्टिजन टेस्ट करण्यात आल्या आहेत त्यात कोरोना संसर्ग झालेले १० रूग्ण संख्या आढळुन आले आहेत तरी असे एकुण बेचाळीस जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन मस्साजोग गाव हे कोरोना महामारीचे हॉटस्पॉट बनले आहे तरी नागरिकांना कोरोना संसर्ग महामारी रोगाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ कांबळे मॅडम ,डॉ चाटे साहेब, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ मुळे सर यांनी केले आहे.
COMMENTS